Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना

दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना

मुंबई | Mumbai

राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीत खरीप हंगाम आढावा बैठकीच आयोजन करण्यात आले होते…

- Advertisement -

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, खरीप हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्तम जावा अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडली. सहकार आणि कृषी विभागाचे यावेळी सादरीकरण झाले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महत्वाचा हंगाम आहे. याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच्या सूचना सबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ भावंडांचा मृत्यू

ते पुढे म्हणाले की, बियाणे-खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठेही तुटवडा भासणार नाही, त्याचबरोबर यामध्ये क्वालिटी राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये बोगस बियाणे वितरीत करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

जर अल-निनो प्रवाहामुळे पाऊस पुढे गेला तर त्यासंदर्भात मार्गर्शन कृषी विभाग आणि सहकार विभाग करतील. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या उपययोजना करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भगूर : उड्डाण पुलावरून मोटारसायकल कोसळली; युवकाचा मृत्यू

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना सर्व नियोजनानंतर कुठलीही अडचण येऊ नये अशी आमची भूमिका आहे. तसेच ज्या बँका जबाबदारीने वागणार नाही, शेतकऱ्यांना बाजूचे निर्णय घेणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Sengol : नव्या संसद भवनात लावण्यात येणार ‘सेंगोल’… काय आहे ‘सेंगोल’चा इतिहास?

- Advertisment -

ताज्या बातम्या