Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याखान्देशात महिन्याभरापासून कोरोनाने एकही मृत्यू नाही

खान्देशात महिन्याभरापासून कोरोनाने एकही मृत्यू नाही

नाशिक

खान्देशात (khandesh)दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे खान्देशची (khandesh)वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. खान्देशात नंदुरबार (nandurbar) जिल्हा व धुळे (dhule) शहर कोरोनामुक्त झाला आहे. जळगावात (jalgaon) फक्त ३३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. गेल्या महिन्याभरापासून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात एकही कोरोना मृत्यू झालेला नाही.

- Advertisement -

रँगिग काय आहे ? यासंदर्भातील कायदा काय?

नंदुरबारमध्ये ८ जूननंतर कोरोनामृत्यू नाही. जळगावात १६ जुलैनंतर एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. धुळ्यात ८ जुलैपासून एकही मृत्यू नाही. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी खान्देशातील तीन जिल्ह्यात महिन्याभरापासून एकही मृत्यू नसल्याचे सांगितले.

जळगावात ३३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, बुधावारी एकच रुग्ण

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. परंतु बुधवारी जिल्ह्यात केवळ एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. तसेच जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड, या 14 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 671 एवढी झाली आहे. दुसरीकडे 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.1 लाख 40 हजार 63 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 33 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.

धुळे कोरोनामुक्त पहिले शहर

धुळे (dhule) शहरातही २५ जुलैपासून एकही कोरोना रुग्ण नाही. तसेच ३ ऑगस्टपासून कोरोना रुग्णही सापडला नाही. यामुळे धुळे(dhule) शहर कोरोनामुक्त जाहीर झाले आहे. कोरोनामुक्त होणारे धुळे हे राज्यातील पहिले शहर आहे. अशीच परिस्थिती 28 दिवस राहिल्यानंतर धुळे महानगर कोविड फ्रि म्हणून जाहीर होवु शकतो. संपुर्ण राज्यात अशा प्रकारे कोविड मुक्त शहराकडे वाटचाल करण्यास धुळे महानगर अग्रेसर ठरलेले आहे. हा सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या सांघिक प्रयत्नांचा परिणाम आहे. धुळे महापालिकेमार्फत (Dhule Municipal Corporation) वेळोवेळी कोविड काळात यशस्वी कार्यवाही केलेली आहे.

नंदुरबार कोरोनामुक्त

नंदुरबार जिल्हयात दाखल असलेला अखेरचा रुग्ण ११ ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याने संपुर्ण जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हयात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट १६.४६ टक्के होता तर रिकव्हरी रेट ९७.६४ टक्के आहे. डेथ रेट २.३५ टक्के होता.नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत २ लाख २८ हजार ९७४ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यात नंदुरबार तालुक्यातील ९२ हजार ३३८, शहादा तालुक्यातील ५८ तिार १९४, तळोदा तालुक्यातील २५ हजार २८६, नवापूर तालुक्यातील २७ हजार ६६०, अक्कलकुवा तालुक्यातील १० हजार २९०, धडगाव तालुक्यातील ९ हजार ३१४ रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी १ लाख ८७ हजार ७४५ रुग्णांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या