Braking # भोसरीप्रकरणी खडसेंना जेलमध्ये जावेच लागेल

भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांची माहिती
Braking # भोसरीप्रकरणी खडसेंना जेलमध्ये जावेच लागेल

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी (Bhosari land embezzlement case) राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांना जेलमध्ये (jailed) जावेच लागेल हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असल्याची माहिती भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Former BJP Minister MLA Girish Mahajan) यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली.

भाजपाची बैठक आ. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आ. महाजन पुढे म्हणाले की, भोसरी जमीन प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे जावाई गेल्या 13 महिन्यांपासून जेलमध्ये आहे. याचाच अर्थ त्या व्यवहारात अनियमीतता झाली आहे. खडसे यांनी मंत्री असतांना अनेक गैरकृत्ये केली. त्याचाच हा परिपाक आहे. त्यामुळे खडसेंना जेलमध्ये जावेच लागणार आहे. त्यात कुणाचाही हात किंवा पाय नाही.

खडसेंनी भाजपा-सेना युतीचे सरकार कोसळेल असे विधान केले होते. त्यावरही आमदार गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत सांगितले की, त्यांनी आता केवळ स्वप्नच पहावे. विधानसभेत आमचे 166 आमदार आहेत. खडसेंची अवस्था सध्या अत्यंत केविलवाणी झाली आहे. भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेले.

त्याठिकाणी आमदार झाले त्यांना वाटले आता मंत्री होऊ आणि आपण ह्यांना जेलमध्ये टाकू. पण हे स्वप्न त्यांनी पाहत रहावे असा टोलाही आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला.

दुध संघाबाबत गंभीर तक्रारी

जिल्हा दुध संघात मोठ्या प्रमाणावर अनियमीतता आहे. नोकरभरतीसाठी काहिंनी आगाऊ रक्कम घेऊन ठेवल्या आहेत. अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्या आहेत. म्हणून या तक्रारींची चौकशी व्हावी म्हणून समिती नेमण्यात आली आहे. जसे पेराल तसेच उगवणार आहे. त्यामुळे आता उगवायची वाट त्यांनी पहावी.

ज्यांना वाटते की आपण पवित्र आहोत तर मग चौकशीला सामोरे जावे असेही आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com