केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणे पडले महागात
केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे...

काल शनिवारी (दि. १४) केतकीला अटक करण्यात आली होती. ठाणे कोर्टाचे न्यायाधीश वी. वी. राव जडेजा यांच्यासमोर केतकीच्या केसची सुनावणी झाली.

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी
शिवसेनेपाठोपाठ भाजपची आज 'उत्तर' सभा; फडणवीसांची तोफ धडाडणार

केतकीला सुट्टीच्या न्यायालयात (Court) हजर करण्यात आले. पोलिसांनी (Police) केतकीच्या पोस्टबाबत तपासासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

केतकीने वकील न घेता स्वतः युक्तिवाद केला. तर ठाणे गुन्हे शाखेने पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

Related Stories

No stories found.