चर्चित ‘रामटेक’वर केसरकरांचा मुक्काम; विखे पाटील यांना रॉयलस्टोन

चर्चित ‘रामटेक’वर केसरकरांचा मुक्काम; विखे पाटील यांना रॉयलस्टोन

मुंबई । प्रतिनिधी | Mumbai

मंत्रिपदाची शपथ (Ministerial Oath) घेऊन 15 दिवस उलटल्यानंतर मंगळवारी 18 पैकी 16 मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप (Allotment of Government Bungalows) करण्यात आले.

वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणार्‍या मंत्र्यांच्या दृष्टीने नकोसा असलेला रामटेक बंगला (Ramtek Bungalow) हा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांना मिळाला आहे. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांना पेडर रोडवरील रॉयल स्टोन बंगला (Royal Stone Bungalow) वितरीत करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) 9 ऑगस्टला पार पडला. या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ (Oath of Cabinet Ministership) घेतली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर 14 ऑगस्टला मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले.

आता आज सरकारी बंगला आणि मंत्रालयातील दालनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंत्र्यांना आज शासकीय निवासस्थानाचे वाटप (Allotment of Government Residence) करण्यात आले सामान्य प्रशासन विभागाने आज यासंदर्भातील आदेश जारी केले.

फडणवीस सरकारमध्ये वित्त मंत्री (Minister of Finance) असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना पूर्वी देवगिरी हा बंगला होता. आता देवगिरी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठेवून घेतल्याने मुनगंटीवार यांना पर्णकुटी हा बंगला मिळाला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांना मंत्रालयासमोरील रत्नसिंधू या बंगल्यातून मुक्काम हलवावा लागला आहे. त्यांना मलबार हिलवरील मुक्तगिरी बंगला मिळाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com