केरळ विमान दुर्घटना : मृत्यूचा आकडा १८ वर
मुख्य बातम्या

केरळ विमान दुर्घटना : मृत्यूचा आकडा १८ वर

विमानाचे दोन तुकडे, पायलटचाही मृत्यू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

तिरुअनंतरपुरम | Thiruvananthapuram -

केरळमध्ये शुक्रवारी झालेल्या विमान अपघातातील मृतांचा आकडा 18 झाला आहे. यामध्ये 2 पायलटचा समावेश आहे. दिल्लीवरून एअर इंडियाचे एक विमान तपास पथक घेऊन कोझिकोड येथे पोहोचले असून पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विशेष विमान मुंबईवरून पाठवण्यात आले आहे. केरळच्या कोझिकोड येथील विमानतळावर शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँडींग होत असताना धावपट्टीवरून घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. 173 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 15 जण गंभीर जखमी आहेत. या विमानात एकूण 191 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाच्या पायलटचाही मृत्यू झाला आहे. Kerala plane crash

घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका यांच्यासह मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट IX 1344 हे दुबईहून केरळच्या कोझिकोड या ठिकाणी आलं होतं. या विमानाचा धावपट्टीवर अपघात झाला आहे. या विमानातील प्रवाशांमध्ये 10 लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती आम्ही वेळोवेळी देऊ असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.

सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सगळ्यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. फोनवर त्यांनी या अपघाताबाबतची विचारपूस केली. सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com