Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकेजरीवाल म्हणतात, “नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा, अर्थव्यवस्था सुधारेल”

केजरीवाल म्हणतात, “नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा, अर्थव्यवस्था सुधारेल”

दिल्ली | Delhi

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारला महत्त्वाची सूचना केली आहे. भारतीय चलनी नोटांवर (Currency Note) राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासोबतच श्रीगणेश (Ganesh) आणि लक्ष्मी (Laxmi) यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांच्या या अनोख्या मागणीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल म्हणाले, “महात्मा गांधींसोबत नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो पाहिजे. लक्ष्मीपूजनावेळी मला ही कल्पना सूचली. भारतात लक्ष्मी आणि गणपतीवर श्रद्धा असणारे लोक आहेत. त्यामुळे या देवतांचे फोटो चलनी नोटांवर पाहिजेत. देवी लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते. त्याचबरोबर भगवान श्रीगणेश सर्व अडथळे दूर करतात, ते विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे या दोघांच्या फोटोंचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. यामुळे आपली अर्थव्यवस्था सुधारेल. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही, पण किमान नवीन नोटा छापल्या जातात त्यावर ही सुरुवात केली जाऊ शकते आणि हळूहळू नवीन नोटा चलनात येतील.” तसेच या मागणीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेला पत्र देणार असल्याचंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

कॉलेजमधील प्रेम प्रकरण, बंगळूरूमध्ये लग्नगाठ; ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांची फिल्मी लव्हस्टोरी वाचाच

सध्या हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. गुजरातच्या निवडणुकादेखील प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळलं असल्याचे बोलले जात आहे. केजरीवाल यांनी गोवा निवडणुकीतदेखील अशीच धार्मिक खेळी खेळली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या