Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकरीविरोधी राजकारण्यांना दूर करा - खा. पवार

शेतकरीविरोधी राजकारण्यांना दूर करा – खा. पवार

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून, त्याला त्याच्या घामाची योग्य किंमत देणे गरजेचे असताना सत्ताधार्‍यांचे धोरण शेतीमाल निर्यातीला विरोध व आयातीला सूट असे असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे, यासाठी शेतकरी विरोधी राजकारणी सत्तेपासून दूर करण्याचे काम आपणास करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

- Advertisement -

देवळाली मतदारसंघातील देवरगाव येथील आदिवासी आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खा. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, यासाठी बळीराजाला शासनाने बळ दिले पाहिजे, देवळाली मतदार संघातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची आ. सरोज आहिरे यांनी कल्पकतेने सोडवणूक केली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आदिवासींचे योगदान देशाच्या स्वातंत्र्य काळापासून मोठे आहे, आदिवासींना पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम आघाडी सरकारने केल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून आ.सरोज अहिरे यांनी एकलहरा औष्णिक वीज केंद्राचा 660 मेगाव्हॉट प्रकल्पचा प्रश्न प्रलंबित आहे, तो सोडविण्यासाठी पवार साहेबांनी मध्यस्थी करावी, असे आवाहन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

व्यासपीठावर आ. अ‍ॅॅड. माणिकराव कोकाटे, माजी खा. देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सरचिटणीस अ‍ॅॅड. नितीन ठाकरे, व्यापारी बँक चेअरमन निवृत्ती अरिंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, मुरलीधर पाटील, दिलीप थेटे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रतन जाधव, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या