Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापाऊस सुरु होताच काजीगढीकरांचे जीव मुठीत

पाऊस सुरु होताच काजीगढीकरांचे जीव मुठीत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर परिसरात कोट्यावधी रुपयांची कामे यापूर्वी देखील झाली आहे तसेच प्रस्तावित देखील आहे, मात्र शेकडो नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या काजिगढीच्या प्रश्नावर अद्याप शासन तसेच प्रशासनाने तोडगा काढलेला नाही. यामुळे भर पावसाळ्यात काजीगढीचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे. याबाबत राज्य शासनासह महापालिका प्रशासकांनी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने पुन्हा हा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गंगाघाटाच्या परिसरात असलेल्या काजीगढीचा प्रश्न काही नवीन नाही. मागील सुमारे 25 वर्षापासून हा वाद सुरू आहे. अनेक वेळा याबाबत निर्णय होऊन देखील प्रत्यक्षात काम झालेले नाही. काजीगढीवर सुमारे 100 पेक्षा जास्त घरे असुन हे कुटुंब आपले जीव मुठीत घेऊन राहत आहे. त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे संरक्षण भिंत बांधण्यात यावी, जेणेकरून ती ढासळण्याची शक्यता राहणार नाही. मात्र प्रशासन याकडे सतत दुर्लक्ष करीत आले आहे. मध्यंतरी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते शाहू खैरे यांच्या पुढाकाराने संरक्षण भिंतीसाठी सुमारे चार कोटी रुपये मंजूर देखील झाले होते, यामुळे लवकरच भिंत उभारण्यात येईल, अशी आशा व्यक्त होत असताना तो ठरावच रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.

त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मेरी संस्थेद्वारे देखील येथील मातीची चाचणी झाली आहे. मात्र त्याचा अहवाल देखील अद्याप गुलदस्त्यातच आहे. गत काही वर्षांमध्ये गढी वरील माती घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे पुन्हा धोका वाढला आहे. नाशिक महापालिका प्रशासनाने काजीगढीसह शहरातील सुमारे एकूण 1500 धोकादायक इमारतींना नोटिसा बजावले आहे. तसेच दोन नोटीस झाल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत कारवाई होणार आहे. यामुळे आगामी काळात काजीगढीवासी तसेच प्रशासनात संघर्ष वाढणार आहे. तरी लोकप्रतिनिधी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा गंभीर प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या