Video : 'काय झाडी...काय डोंगार...' फेम शहाजी बापू पाटलांची बंडखोर आमदारांनी घेतली 'विकेट'

Video : 'काय झाडी...काय डोंगार...' फेम शहाजी बापू पाटलांची बंडखोर आमदारांनी घेतली 'विकेट'

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते (ShivSena leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड (Rebellion) पुकारल्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच एकीकडे राज्यातील वातावरण तापलेले असतांना दुसरीकडे शिंदे गटातील (shinde group) सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) सांगोला मतदारसंघाचे (Sangola constituency) बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे त्यांच्या 'काय झाडी...काय डोंगार..काय हाटील..एकदम ओके हाय सगळं' या वाक्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत...

काही दिवसांपूर्वी आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांची त्यांच्या एका कार्यकर्त्यासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांने आमदारांना ते सध्या कोठे आहेत? असा प्रश्न विचारला असता, 'आपण सध्या गुहाटीत असून इथे काय झाडी...काय डोंगार...काय हाटील...एकदम ओके हाय सगळं...' असं आमदारांनी त्यांच्या सोलापूरी बोलीत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल झाले होते. एवढेच काय त्यांच्या या वक्तव्यावरुन मीम्स आणि नवनवीन गाणी देखील आता तयार झाली आहेत.

त्यानंतर आज सकाळी शिंदे गटातील सगळे आमदार गुवाहाटीतील (Guwahati) हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या (Radisson Blu Hotel) लॉबीत आले असता सर्व आमदारांनी शहाजी बापू पाटील यांचे मनापासून कौतुक केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पाटील यांना हे त्यांचे सुपरहिट वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. त्यावेळी शहाजी पाटलांनी एकनाथ शिंदेंसमोर हे वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवले. तसेच हे वाक्य किती व्हायरल झाले आणि त्याची लोकांनी गाणी तयार केली हे देखील दाखवून दिले.

दरम्यान, यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी आपण एकनाथ शिंदेंसोबत का आलो याबद्दलही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या (Congress - NCP) मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला होता. आमचा विरोध हा महाविकास आघाडीला (mahavikas aaghadi) असून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसून याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती असे देखील ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com