Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआबांच्या मुलाने करुन दाखवले : म्हणाला होता, निकालावेळी माझ्या बापाची आठवण येईल

आबांच्या मुलाने करुन दाखवले : म्हणाला होता, निकालावेळी माझ्या बापाची आठवण येईल

माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा मुलगा व राष्ट्रवादी काँग्रेसचे 23 वर्षीय युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. त्यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

- Advertisement -

रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.

नंदुरबारात पालकमंत्री पाडवी यांना धक्का : पाहा, राज्यातील महत्वाचे निकाल, एका क्लिकवर

निकालानंतर रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही”

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

रोहित पाटील प्रचारावेळी काय म्हणाले होते?

कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल येत्या 19 तारखेला येईल. माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालावेळी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो तुम्ही काय कामं केली ते सांगा. आता माझं वय २३ आहे, पंचवीस वर्षे होईपर्यंत विरोधक काहीच शिल्लक ठेवत नाही.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल

रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10

शेतकरी विकास पॅनल 6

अपक्ष 1

- Advertisment -

ताज्या बातम्या