कसबापेठ, चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल

कसबापेठ, चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबापेठ तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची ( Chinchvad, kasbapeth by-election) मतमोजणी आज, गुरुवारी होऊन निकाल जाहीर होणार आहे. युती आणि महविकास आघाडीने आपली राजकीय ताकद पणाला लावून पोटनिवडणूक लढवल्याने या लढाईत कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबापेठ, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत निम्म्या मतदारांनी घरी राहणे पसंत केले. पोटनिवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने निकालाविषयी उत्सुकता आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.

कसबापेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच युती आणि महाविकास आघाडी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालाविषयी उत्कंठा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com