कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

पुणे | Pune

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज ( २६ फेब्रुवारी ) मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

दरम्यान, चिंचवड येथील पिंपळेगुरव मतदान केंद्राबाहेर मतदानादरम्यान माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. या मतदान केंद्रांवर सकाळी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदान केल्यावर त्याच्या दोन तासांनी हा प्रकार घडला. पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर ही घटना घडली.

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी
पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर भाजपचे माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावर राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी असतांना त्यांना कुठल्याही प्रकारे निर्बंध नाही मात्र आम्हालाच का असे विचरल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी
“होय मी गद्दारी केली, कारण...”; गुलाबराव पाटील यांनी जाहीरच सांगितले

राहुल कलाटे यांचे कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अपक्ष उमेदवार राहुल कालाटे यांचे काही कार्यकर्ते हे या मतदार संघा समोर जमले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना हटकले आणि मतदार केंद्रापासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, कालाटे समर्थकांनी यावर आक्षेप घेतला. या केंद्रापुढे भाजप कार्यकर्ते असतांना आम्हालाच का बाजूला सारले जात आहे, असे म्हटल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी दोन्ही गट भिडले. दरम्यान, पोलिसांनी देखील हस्तक्षेप केला. त्यांनी सौम्य लाठीचार्ज करत काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मतदान केंद्रापासून दूर केले. तसेच येथील बंदोबस्त देखील वाढवण्यात आला.

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, अनेक विद्यार्थ्यी जखमी

चिंचवड विधानसभा या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अर्थात मतदानाच्या पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान झाले.

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी
तुम्हाला माहिती आहे का? 'स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत रंगली आहे. भाजपकडून अश्विनी जगताप तर, महाविकास आघाडीकडून नाना काटे मैदानात आहेत. तर, राहुल कलाटे अपक्ष लढत आहेत. तर, तिन्हीही उमेदवारांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे चिंचवडकर कोणाला आपला कौल देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com