Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याPune Bypoll Election Results 2023 : अश्विनी जगताप १० हजारांहून अधिक...

Pune Bypoll Election Results 2023 : अश्विनी जगताप १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर

अश्विनी जगताप १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. २१ व्या फेरी अखेर मिळालेली मते :  अश्विनी जगताप : ७४,१७४ नाना काटे : ६१,८०४ राहुल कलाटे : २५,८८४ कसब्यात भाजपला धोबीपछाड, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल ११ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. कसब्यात धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला आहे.  भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे.कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाच्या आता फक्त दोन फेऱ्या बाकी राहिल्या आहेत. आतापर्यंत १८ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. धंगेकरांची निर्णायक आघाडी दिसून येत आहे.पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ८१९६ मतांनी आघाडीवर आहेचिंचवड पोटनिवडणूक : भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम. अश्विनी जगताप ४२,६७१, नाना काटे ३४,३२९पंधराव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ६ हजार ७००  मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba and Pimpri-Chinchwad by-elections) मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. यात चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानामध्ये चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. तर कसब्यातून पोस्टलमध्ये मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष मतमोजणीवेळी देखील या दोघांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ३१५७९ तर राष्ट्रवादीचे (NCP) नाना काटे यांना २५२८५ मते मिळाली असून आठव्या फ़ेरीअखेर भाजपच्या जगताप ६ हजार ३७४ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ९९८५ मते मिळाली आहेत. तर कसब्यात काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ४१२४१ तर भाजपच्या (BJP) हेमंत रासने यांना ३७९४१ मते मिळाली असून अकराव्या फेरीअखेर काँग्रेसचे धंगेकर ४ हजार ४८१ मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या