कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

पुणे | Pune

शिंदे-फडणवीस यांच्या युतीबरोबरच महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) प्रतिष्ठेची केलेली कसबा-चिंचवड पोटनिवडणुक (Kasba-Chinchwad by-election) आता अंतिम टप्प्यात आली असून, त्यासाठीच्या प्रचाराची मुदत आज अखेर संपली आहे...

कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
अरविंद केजरीवाल, भगवंत मान घेणार उद्धव ठाकरेंची भेट; काय आहे कारण?

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षात जनाधार नेमका कोणाच्या बाजूने आहे, याचे चित्र कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील (Legislative Assembly by-elections) निकालात उमटणार आहे. यामुळे या पोटनिवडणुकीचा प्रचार प्रचंड तापला होता. आज येथील प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय युती-आघाड्यांनी आपली ताकद पणाला लावली.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 'हे' आहे कारण

दिवसभर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला.

कसब्यात भाजपच्या हेमंत रासने (Hemant rasne) विरुद्ध काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांच्यात लढत आहे. त्याचप्रमाणे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) पाठींबा जाहीर केलेले उमेदवार राहुल कलाटे (Rahul kalate) यांच्यात लढत बघायला मिळते आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात आणि शक्तीप्रदर्शन करण्यात कुठेही कमतरता ठेवली नाही. नियमानुसार आज संध्याकाळी पाच वाजता प्रचारच्या तोफा थंडावल्या असून, प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे पक्ष अंतर्गत रणनीतीवर भर देतील आणि विजयासाठी प्रयत्न करतील.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
हे सरकार येण्यामागे अदृष्य हात; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com