करोना : कर्नाटकात सर्व प्रतिबंध हटवले

आता ई पास शिवाय करता येईल प्रवास
ई-पास
ई-पास

नवी दिल्ली

केंद्र सरकारनेही राज्यातंर्गत असलेल्या वाहतुकीवरील निर्बंध उठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्र सरकारच्या निर्णायाकडे लक्ष लागले आहे.

राज्यांनी स्थानिक पातळीवर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांची वाहतूक, पुरवठा साखळी, आर्थिक कामकाज बिघडणे आणि बेरोजगारी वाढणे असे परिणाम होत आहेत आहे. यामुळे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात पत्र लिहून निर्दश दिले होते. या पत्रात म्हटले आहे की, ‘ केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले आहे. आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधने नसतील, असे केंद्र सरकारने अनलॉकिंगच्या नियमावलीत स्पष्ट केले आहे.

केंद्राच्या या पत्रानंतर मंगळवारी कर्नाटक सरकारने पाऊल उचलत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत ई पासची सक्ती रद्द केली. तसेच १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय रद्द केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com