कर्नाटक घटनेचे पडसाद : शिवसेनेकडून आंदोलन, भाजपचा काँग्रेसवर आरोप

शिवसेना
शिवसेना

बंगळुरू

बेळगावमध्ये मराठी आणि कानडी भाषिकांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही छोटी घटना असल्याचे म्हटल्यामुळे त्यांच्यावरही जोरदार टीका होत आहे. दरम्यान, या प्रकारावरून भाजपाने (bjp)एक धक्कादायक दावा करत गंभीर आरोप केला आहे. दरम्यान कर्नाटकच्या घटनेचे पडसाद आता मुंबईत पडू लागले आहेत. शिवसैनिकांकडून(ShivSena Worker) या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) शिवसैनिकांनी आंदोलन करण्यात आला आहे. माँसाहेब यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा तरुण हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तसेच या तरुणाचे काँग्रेसचे कर्नाटकमधील बडे नेते डी.के. शिवकुमार यांच्यासह इतर नेत्यांसोबतचे फोटेही आता व्हायरल होत आहेत.

भाजपाचे नेते सी.टी. रवी म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मी निषेध करतो. कर्नाटकमधील राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी हे कृत्य घडवण्यात आले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या शिवरायांचा अवमान करणाऱ्या या कृत्याबाबत उद्धव ठाकरे सोनिया गांधींना जाब विचारतील का, असा सवालही रवी यांनी विचारला आहे.

शिवसेना
रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

राष्ट्रवादी आक्रमक

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. कन्नडीकांचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com