कर्नाटक सरकारचा केंद्र सरकारला सवाल; सोशल मिडियाच्या वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करावी

सोशल मीडिया
सोशल मीडिया

नवी दिल्ली | New Delhi

सोशल मिडिया वापरात शाळेत जाणाऱ्या मुलांच्या संख्येत लाक्षणिक वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. शाळेत जाणारे मुले सोशल मिडियाच्या आहारी गेली असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. सोशल मिडीया असो वा इतर कोणतीही गोष्ट असो तिच्या वापरावबाबत मर्यादा असावी असे निरीक्षण नोंदवत सोशल मिडीया वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करावी अशी सुचना कर्नाटक उच्च न्यायालयाने केली आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ब्लॉकिंग आदेश एकल खंडपीठाने कायम ठेवले होते. याला सोशल मीडिया ॲप ट्विटर कंपनीने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, या याचिकेवर न्यायमूर्ती जी नरेंद्र आणि न्यायमूर्ती विजयकुमार हे पाटील यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली यावेळी खंडपीठाने आपले निरीक्षण नोंदवले.

या सुनावणी दरम्यान या न्यायमूर्ती जी. नरेंद्र म्हणाले सरकारने सोशल मीडियाच्या वापरासाठी वयोमर्याद निश्चित करण्याबाबत विचार केला पाहिजे. जेव्हा वापर करताना नोंदणी करतो, तेव्हा त्याला किंवा तिला विशिष्ट सामग्री प्रदान करावी लागेल. शाळेत जाणारी मुले एखाद्या व्यसनासारखी सोशल मीडियाच्या आहारी गेली असल्याने कोणती गोष्ट वापराची नियमांप्रमाणे वयोमर्यादा असावी.

सोशल मीडिया वापर करती मुले १७ किंवा १८ वर्षांची असू शकतात परंतु तसे आहे का? असा सवाल करत देशाच्या हिताचे काय आणि काय नाही हे ठरवण्याची परिवकवता आहे फक्त सोशल मीडियावरचे नाही तर इंटरनेटवरील मन भ्रष्ट करणाऱ्या अशा गोष्टी काढून टाकल्या पाहिजे असे निरीक्षणही न्यायमूर्तीची नरेंद्र यांनी नोंदवले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com