Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka Election Results : विजयानंतर बोलताना डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; म्हणाले,...

Karnataka Election Results : विजयानंतर बोलताना डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; म्हणाले, “मी कधीही विसरू शकत नाही की…”

बंगळुरू | Bangalore

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसनं धोबीपछाड दिलं आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेसनं 128 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर, भाजपला अवघ्या 67 जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, असं असलं तरी भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. या यशाबद्दल काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तर, पक्ष नेतृत्त्वाबद्दल बोलताना ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सोनिया गांधी यांनी २०२० मध्ये तिहार जेलमध्ये माझी भेट घेतली, त्यावेळी, मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीने मला अटक केली होती, असे सांगताना शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले होते.

कर्नाटकात काँग्रेसचा सावध पवित्रा, ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवत मला कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, असेही शिवकुमार यांनी म्हटले. तर, यावेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आठवणही त्यांनी करुन दिली.

डीके शिवकुमार कर्नाटकमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. कनकपूरा सीटमधून सातत्याने 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डीके शिवकुमार अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहेत. 2013 मध्ये ते जेडी (s) PGR सिधिंयांना हरवून 30,000 हून अधिक मतांनी निवडून आले होते. केवळ सिधिंयाच नाही तर शिवकुमार यांनी जद (s) सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच डी कुमारस्वानी यांना बंगळुरू ग्रामीणमधून हरवलं आहे. या यशानंतर त्यांना जाइंट किलर नावाने ओळख मिळाली.

सीईओंचा रुद्रावतार पाहून ६ घटस्फोटीतांची बदलीतून माघार

शिवकुमार यांना रणनीतीकारदेखील मानलं जातं. आणि संकटाच्या काळात पक्षासाठी ते धावून जातात अशीही ख्याती आहे. त्यांनी 2018 च्या निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस आणि जदच्या आघाडी सरकारचं गठण होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. केवळ कर्नाटकच नाही तर त्यांनी बंगळुरू आणि महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांना पाठबळ दिलं. कारण त्यावेळी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाच्या सरकारला संकटाचा सामना करावा लागला होता.

Weather Update : राज्यात उष्णतेची लाट, ७२ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

डीकेएस यांनी 2017 मध्ये चर्चेत आले होते. गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी गुजरात काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये जाण्यासाठी रोखण्यासाठी पार्टीला बंगळुरूमधील आपल्या रिसॉर्टमध्ये घेऊन जाण्यास मदत केली होती. शिवकुमार कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. 2018 मधील निवडणुकीत नामांकन दाखल करताना त्यांनी 840 कोटींची संपत्ती असल्याची घोषणा केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या