Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, खर्गेंच्या लेकासह 'हे' ८ आमदार बनणार मंत्री

कर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, खर्गेंच्या लेकासह ‘हे’ ८ आमदार बनणार मंत्री

दिल्ली | Delhi

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार हे आज शपथ घेणार आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत पद आणि गोपनियतेची शपथ देतील. मुख्यमंत्र्यांसोबत कोण शपथ घेणार याची यादी समोर आली आहे.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या ज्या नेत्यांना आज मंत्री बनवण्यात येणार आहेत त्यामध्ये डॉ. जी परमेश्वर, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज. एमबी पाटील, सतीश जारकीहोली, प्रियांका खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान यांची नावे आहेत. यापैकी प्रियांक खर्गे हे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचे पुत्र आहेत.

भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची कारला धडक; एकाच कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर आणि मुख्यमंत्री कोण होणार याच्या जोरदार चर्चेनंतर हा सरकारचा शपतविधी सोहळा होत आहे. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली आहे.

७५ वर्षीय सिद्धरामय्या हे मागासवर्गीय नेते असून त्यांचा पाच दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव आहे. तर कर्नाटक काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष डीके शिवकुमार, हे वोक्कलिंगा समुदायाचे आहेत, त्यांना काँग्रेसचे तारहाण आणि सत्ता मिळवणारे शिल्पकार म्हणून पाहिले जाते. त्यांच्यामुळे कर्नाटकात काँग्रेसने विजय मिळवलाय असे सांगितले जात आहे.

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

या शपथविधी सोहळय़ाकडे विरोधकांच्या ऐक्याचे प्रदर्शन आणि शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे. त्यासाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, भाकपचे डी. राजा आणि माकपचे सीताराम येचुरी, कमल हासन यांचा समावेश आहे.

Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? ‘या’ आमदारांची नावे चर्चेत..

मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळय़ास जाणार नाहीत. त्याऐवजी त्या पक्षाच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांना आपल्या प्रतिनिधी पाठवणार आहेत, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ट्वीट करून दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या