Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka CM : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज होणार फैसला

Karnataka CM : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज होणार फैसला

दिल्ली | Delhi

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

- Advertisement -

कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या गळ्यात पडते की प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या गळ्यात पडते याची त्यांच्या समर्थकांसह सर्वच वाट पाहात आहे. सिद्धरमैय्या आज पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. डी.के.शिवकुमार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे ते दिल्लीला जाण्याची शक्यता कमी आहे.

VIDEO : शेवगाव येथे संभाजी महाराज मिरवणुकीत दगडफेक, ४ पोलीस जखमी

डी.के.शिवकुमार यांनी आज त्यांच्या समर्थकांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘आज माझा जन्मदिवस आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटीसाठी येत आहेत. पूजा अर्चनाही करायची आहे. त्यामुळे सध्याच दिल्लीला जाण्याचा विचार नाही. निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली आहे. माझे काम मी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त हायकमांड काय भेट देणार हे मला माहित नाही. कर्नाटकच्या जनतेने तर आधीच सर्वात मोठी भेट दिली आहे.’

विधीमंडळ पक्षाची बैठक रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सिद्धरमैय्या आणि डी.के.शिवकुमार देखील उपस्थित होते. सिद्धरमैय्या यांनी मुख्यमंत्री निवडीचे अधिकार पक्षाध्यक्ष खर्गे करतील असा प्रस्ताव मांडला. डी.के.शिवकुमार यांच्यासह सर्व आमदारांनी एकमताने प्रस्तावाचे समर्थन केले. हॉटेलमध्ये बैठक सुरु असताना बाहेर डीके आणि सिद्धरमैय्या समर्थकांची घोषणाबाजी सुरु होती.

Akola Violence : अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक अन् जाळपोळ… एकाचा मृत्यू, कलम १४४ लागू

एकीकडे शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना दुसरीकडे कार्नाटकात एका नव्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यात दोन मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी सिद्धरामय्या डीके शिवकुमार यांना पहिली दोन वर्षे आणि डीके शिवकुमार यांना शेवटची तीन वर्षे मुख्यमंत्री बनवण्याच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करू शकतात. असा सल्लाही सिद्धरामय्या यांनी पक्षाला दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या