Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशसीमाप्रश्न चिघळणार! महाराष्ट्रातील 'त्या' ४० गावांवर कर्नाटकची नजर

सीमाप्रश्न चिघळणार! महाराष्ट्रातील ‘त्या’ ४० गावांवर कर्नाटकची नजर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील (Maharashtra-Karnataka Border Dispute) बैठकीनंतर महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न धुमसत असताना कर्नाटकची नवी कुरापत सुरू आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सांगली (Sangali) जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणारी सीमाप्रश्नी सुनावणी पुढे ढकलली गेली असली तरी, महाराष्ट्रातील काही गावांवर आपला हक्क सांगून या प्रकरणात अडथळा आणण्याचा कर्नाटकाचा प्रयत्न आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल आणि शेजारच्या राज्यात राहणाऱ्या कन्नडिग स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतनही देईल. त्यासाठी आम्ही आवश्यक कागदपत्रे गोळा करत आहोत. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बोम्मई यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर टीका केली आहे. सीमावाद हे महाराष्ट्रात राजकीय हत्यार बनले आहे आणि सत्तेत असलेला कोणताही पक्ष राजकीय हेतूने हा मुद्दा उपस्थित करत राहतो. परंतु, त्यांना अद्याप यश मिळालेले नाही आणि भविष्यातही मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या