पुण्यात ठाकरे गटाचा राडा; कर्नाटकच्या बसेसला फासले काळे

पुण्यात ठाकरे गटाचा राडा; कर्नाटकच्या बसेसला फासले काळे

पुणे | Pune

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र –कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border) पुन्हा एकदा चिघळा असून त्याचे पडसाद महाराष्ट्रासह कर्नाटकात उमटत आहेत...

अशातच आज बेळगावजवळील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ (Hirebagwadi Toll Booth) महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून (Kannada Rakshana Vedike workers) हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर याला प्रत्युत्तर देण्यात आले असून पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, आज राज्याचे मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील ( (Minister Chandrakant Patil) बेळगावला जाणार होते. पंरतु, त्याअगोदर कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाल्याने मंत्र्यांचा बेळगाव (Belgaum) दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com