Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकरंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना आमुलाग्र बदल घडवणारी - मुख्यमंत्री

करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना आमुलाग्र बदल घडवणारी – मुख्यमंत्री

नाशिक | Nashik

पाणी (Water) हा माता-भगिनींच्या जिव्हाळ्याचा विषय असून नांदगाव मतदारसंघातील (Nandgaon Constituency) मनमाड येथील पाण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता. तो प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी सातत्याने करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न माझ्याकडे मांडला. त्यानंतर मी त्यासाठी तात्काळ निधी मंजूर करत मनमाडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले…

- Advertisement -

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदगाव मतदारसंघातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी योजनेसह विविध सेवांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलते होते. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, यांच्यासह आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

हृदयद्रावक! चुलीतील ठिणगीमुळे झोपडीला आग; पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या सरकारने गेल्या सहा ते सात महिन्यात लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दीड लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या मनमाड शहरातील लोकांसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना आमुलाग्र बदल घडवणारी असल्याचे म्हटले.

WPL Auction 2023 : स्मृती मंधाना ठरली आतापर्यंतची सर्वात महाग खेळाडू, RCB ने ‘इतक्या’ कोटींना केलं खरेदी

पुढे ते म्हणाले की, ज्या योजना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतांना सुरु झाल्या होत्या, त्या योजना अडीच वर्षात बंद झाल्या. परंतु, मागील सहा महिन्यात आमचे सरकार (Government) आल्यानंतर आम्ही त्या तात्काळ सुरु केल्याचे शिंदेंनी सांगितले. तसेच मनमाड नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी तात्काळ १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत; तमिळ नेत्याचा धक्कादायक दावा

तसेच आमदार सुहास कांदेंनी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिल्याने त्यांना या मतदारसंघातील महिलांचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे राज्याच्या येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. याशिवाय राज्यात जी काही अपुरी कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले.

Mumbai Fire : मुंबईत भीषण अग्नितांडव, ५० हून अधिक झोपड्या खाक

- Advertisment -

ताज्या बातम्या