Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकपिल सिब्बल यांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद, म्हणाले...

कपिल सिब्बल यांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद, म्हणाले…

नवी दिल्ली | New Delhi

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटामधील सुनावणी सुरु आहे.

- Advertisement -

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी सुरु असून उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Advocate Kapil Sibal) तर शिंदे गटाकडून नीरज कौल (Neeraj Kaul) यांनी युक्तिवाद केला.

यावेळी न्यायालयात आमचीच शिवसेना (Shivsena) खरी, असा मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला. यावर ठाकरे गटाचे वकिल कबिल सिब्बल यांनी मूळ शिवसेना तुमची मग व्हिपचे पालन का केले नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच शिंदे गटाने पक्ष सोडला नव्हता तर मग व्हिपचे पालन का केले नाही अशी विचारणाही सिब्बल यांनी केली.

तसेच राजकीय पक्षाच्या सदस्याच्या अपात्रतेचा मुद्दा आणि निवडणूक आयोगासमोरील (Election Commission) पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या कार्यवाहीचा कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना हे प्रकरण सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडा आणि त्यानंतर कधीपर्यंत सुनावणी घ्यायची किंवा निर्णय घ्यायचा याबद्दल निर्णय घेऊ असे सांगितले.

याशिवाय घटनापीठासमोर प्रकरण आणण्याची स्थिती निर्माण केली गेली असे कपिल सिब्बलांनी न्यायालयात सांगितले. सगळ्या गोष्टी २० जूनला सुरू झाल्या. २१ जूनला आमदारांची बैठक बोलावण्यात आली. ज्यात अनेक आमदार (MLA) आले नाही, ते गुवाहाटीला गेले’. असे सिब्बल म्हणाले. तसेच शिंदे गटाला (Shinde Group) विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही असे सुद्धा सिब्बल यांनी घटनापीठासमोर सांगितले.

तर आपला वेगळा गट आहे असे ते सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडे १० व्या अनुसूचीनुसार, विलीनीकरणाचा एकमेव पर्याय आहे. असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. तसेच आज निवडणूक आय़ोगाने कार्यवाही केली आणि सर्व याचिकांचा निर्णय आमच्या बाजूने लागला तर काय होणार? अशी विचारणा देखील सिब्बल यांनी खंडपीठाला केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या