Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र“नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते...”; कालीचरण महाराज पुन्हा बरळले

“नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते…”; कालीचरण महाराज पुन्हा बरळले

कोल्हापूर | Kolhapur

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या कथित धर्मगुरू कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केले ते योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य कालिचरण महाराज यांनी केले आहेत. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

- Advertisement -

कालीचरण महाराज हे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा नथुराम गोडसे यांची स्तुती करत महात्मा गांधींवर टीका केली. जितकं तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचण कराल तेवढे त्यांचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधींचे विरोधक व्हाल. नथुराम गोडसे यांनी जे केलं ते योग्यच केलं आहे. महात्मा नथुराम गोडसे यांना कोटी कोटी नमस्कार आहे. ते नसते तर भारताचा नाश झाला असता, असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केली.

बापटांच्या निधनानंतर ४ दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

तसेच या वेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयीही वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली ही कारवाई योग्यच आहे. जे हिंदू हिताची गोष्ट करतात ते यांच्यासाठी शत्रू आहेत असा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. त्यामुळे राहुल गांधी हिंदूवाद्यांची निंदा करतात मात्र हिंदू आता शेळपट राहिला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले .तसेच समाजात होणाऱ्या ज्या दंगली आहेत. त्या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी ना. विखे-मुरकुटे-ससाणे युती निश्चित

कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले. रायपूर येथील धर्मसभेत महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ९५ दिवस गजाआड देखील रहावे लागले होते.

‘ती’ चूक जीवावर बेतली! डासांना मारणाऱ्या कॉईलमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

कालीचरण महाराजचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. एका सर्वसामान्य कुटुंबातील कालीचरण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या