शपथविधी लोकआयुक्तांचा, चर्चा राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या भेटीची

शपथविधी लोकआयुक्तांचा, चर्चा राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या भेटीची

मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे (Vidyasagar Kanade) यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची (Lokayutka) शपथ घेतली. राजभवन येथे गुरुवारी (दि.19) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी हे एकाच मंचावर पाहायला मिळाले.

शपथविधी लोकआयुक्तांचा, चर्चा राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या भेटीची
रँगिग काय आहे ? यासंदर्भातील कायदा काय?

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने १२ आमदारांच्या नावाची यादी देऊन आत आठ महिने झालेले आहे. त्यानंतर राज्यापालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्याचवरुन सरकार आणि राज्यपाल यांच्या धुसफूस सुरुच आहे. तसेच राज्यपालांचा प्रशासनात हस्तक्षेप वाढल्याची टीकाही सत्ताधारींकडून करण्यात येत होती. राज्यपालांच्या मराठवाड्या दौऱ्यासंदर्भात मोठा वाद झाला होता. राज्य सरकार व राज्यपाल यांचे संबंध विकोपाला गेले असतांना मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे एकाच मंचावर आल्याने आता त्याचविषयी अधिक चर्चा सुरु झाली आहे.

शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

न्या.कानडेंचा परिचय

दिनांक २२ जून १९५५ रोजी जन्मलेल्या न्या. कानडे यांनी सन १९७९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात केली. न्या. कानडे यांची दिनांक १२ ऑक्टोबर २००१ रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. दिनांक २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१५ या कालावधीत व त्यानंतर १५ जानेवारी ते २० जानेवारी २०१६ या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते.न्या. कानडे यांनी आपल्या कारकिर्दीत ३४००० प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा केला असून त्यांनी दिलेले १२०० पेक्षा अधिक निकालांचा विधी अहवालांमध्ये उल्लेख केला गेला आहे.

वर्षभर लोकायुक्त पद होत रिक्तच

न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट 2020 मध्ये संपला होता. त्यामुळे हे पद गेले वर्षभर रिक्तच होतं. अशावेळी आता विद्यासागर कानडे यांची आता या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com