Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यादेशाच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा मराठी माणूस; 'हे' नाव चर्चेत

देशाच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा मराठी माणूस; ‘हे’ नाव चर्चेत

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief Justice N. V. ramana) यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत (Uday Lalit) यांच्या नावाची शिफारस केली आहे…

- Advertisement -

आता देशाच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा एकदा मराठी माणूस विराजमान होईल, हे जवळपास निश्चितच झाले आहे. भावी सरन्यायाधीश असलेले न्यायमूर्ती लळीत हे मूळचे कोकणातील (Kokan) आहेत.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या न्यायमूर्ती लळीत यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यातील आपटा इथे स्थायिक झाले आहेत.

उद्धव ठाकरे गटाला ‘सर्वोच्च’ धक्का; ‘ती’ मागणी फेटाळली

न्यायमूर्ती लळीत यांची कारकीर्द

न्यायमूर्ती उदय लळीत (Uday Lalit) यांचा जन्म मुंबईतील आंग्रेवाडी इथे झाला. त्यांनी शिरोडकर हायस्कूलमधून मराठी माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम मुंबईतील ज्येष्ठ वकील कै. एम. ए. राणे यांच्याकडे काही वर्षे सहाय्यक म्हणून काम केले.

सत्तासंघर्षाबाबत पुढील सुनावणी ८ ऑगस्टला; काय घडले आज कोर्टात?

नंतर ते दिल्लीत गेले आणि सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. देशभरातील बहुतांश राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण युक्‍तिवाद केले आहेत. एकूण 14 राज्यांच्यावतीने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केसेस लढवल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या