जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच अटक करण्यात आली.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी त्यांना अटक केली.

त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होत. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com