Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याजितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या

जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra awhad) यांचे माजी अंगरक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

हार्बर मार्गावरील तळोजा ते पनवेलदरम्यानच्या रेल्वे मार्गावर वैभव कदम यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी 9 वाजेच्या सुमारास पनवेल लोहमार्ग पोलिसांना याची माहिती मिळाली आहे. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन, नंतर शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात (Thane Civil Hospital) पाठविले आहे.

जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री (Minister of Housing) असताना वैभव कदम हे त्यांचे अंगरक्षक होते. सध्या ते मुंबई पोलीस दलात हवालदरार पदावर कार्यरत होते. आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण (Beating Anant Karamuse) करण्यात आल्याचे प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते.

IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाचा वापर करून उकळले पैसे, काय आहे प्रकरण ?

यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासह कदम यांच्याबाबतही रोष निर्माण झाला होता. या मारहाणी प्रकरणात कदम यांना अटकही झाली होती. काही दिवसांनी त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. त्यांनी उचललेल्या या टोकाच्या भूमिकेमुळे वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, वैभव कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेट्स ठेवले होते. त्यात त्यांनी “पोलीस आणि मीडियाला एकच विनंती की, मी आरोपी नाही” असे नमूद केले होते या स्टेट्स मुळे कदम यांच्या आत्महत्ये विषयी उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

धक्कादायक! ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरने घेतली उडी

- Advertisment -

ताज्या बातम्या