Video ओबीसी वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड वादात, पाहा काय म्हणाले मंत्री...

Video ओबीसी वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड वादात, पाहा काय म्हणाले मंत्री...

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad)वादात सापडले आहे. ओबीसी (obc)संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने (bjp)त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Video ओबीसी वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड वादात, पाहा काय म्हणाले मंत्री...
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित झालेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आव्हाड यांचे ५१ सेकंदांचे भाषण आहे. त्यात ते म्हणतात, माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही.

व्हिडीओत काय म्हणाताना आव्हाड?

“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं. ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,” असं आव्हाड म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com