जिंदाल कंपनी आग दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीकडून पाहणी

जिंदाल कंपनी आग दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीकडून पाहणी

घोटी । वार्ताहर Ghoti

जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत (Jindal Polyfilm Company )1 जानेवारी रोजी स्फोट होऊन झालेल्या अग्नीतांडवानंतर चौकशीसाठी उच्चस्तर समितीने भेट देत पाहणी केली.

अग्नितांडव दुर्घटनेत 3 कामगारांचा बळी गेला होता तर 17 कामगार जखमी होऊन जीवित व वित्तहानी झाली होती. यावेळी मुख्यमंत्री, पालकमंत्री, कामगार मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींसह वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समितीची नेमणूक करण्यात येऊन शासनास अहवाल पाठवण्यासाठी सूचित करण्यात आले होते. समितीचे आगमण झाले. विश्रामगृह येथे समितीच्या वतीने नागरिकांना आपल्या तक्रारी करण्यास सांगितले होते.

यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी कमिटीस निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांंना कंपनी व्यवस्थापनाने दिलेली माहिती चुकीची असुन कंपनीत सध्या साडेसहा हजार कामगार काम करीत असुन कंपनीत अनेक कामगार अधिकृतरीत्या नाही, आगीस जबाबदार असणार्‍या व्यक्तीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ठेकेदारी पद्धतीने परप्रांतीयांची भरती चुकीची आहे, कंपनीकडून मृत कामगारांना भरघोस मदत द्यावी, कंपनीत स्थानिक प्रकल्प बाधितांना नोकरीत सामावून घ्यावे, कंपनीतील सांडपाणी थेटपणे शेतात जात असल्याने जमिनी नापीक झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.

मुंढेगाव ग्रामपंचायत सरपंच मंगल गतीर व सदस्य यांनी स्थानिकांना रोजगार, प्रदूषण नियत्रण, सांडपाणी प्रक्रिया करणे, आगी दरम्यान झालेल्या स्फोटाने तुटलेल्या घरांची नुकसानभरपाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी कंपनी ठेकेदार, व्यवस्थापन यांच्याकडून समितीने लेखी जबाब घेत माहिती जाणून घेतली. कामगार सुरक्षिततेच्या दुष्टीने देण्यात येत असलेली साहित्य दर्जेदार आहे का, अग्निशमन यंत्रणा कार्याविन्त आहे का, कामगारांचे हमी पत्र, यादी व अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती समिती पदाधिकारी यांच्याकडून देयात आली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पारधी, उच्च स्तरीय समिती सदस्य सचिव अंजली आडे, कामगार उपायुक्त विकास माळी, विद्युत निरीक्षक हेमंत उगले, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांसह कंपनी व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com