रोपवेचा भीषण अपघात, हवेत लटकले ४८ लोक; लष्कराकडून बचाव कार्य सुरु, पाहा व्हिडिओ

रोपवेचा भीषण अपघात, हवेत लटकले ४८ लोक; लष्कराकडून बचाव कार्य सुरु, पाहा व्हिडिओ

दिल्ली | Delhi

झारखंडमधील (Jharkhand) देवघरमध्ये (Deoghar Ropeway Accident) मोठा अपघात झाला आहे. झारखंडमधील देवघर येथील त्रिकुट येथे रोपवेचा अपघात (trikoot ropeway accident ) झाला आहे. या अपघातामुळे ट्रॉली मध्येच अडकल्या असून ४८ जण गेल्या २० तासांपासून फसले आहेत.

कसा घडला अपघात?

रविवारी सकाळी रामनवमीची पूजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी शेकडो पर्यटक आले होते. रोपवे ची एक ट्रॉली खाली येत होती आणि तेव्हाच एक ट्रॉली वरती जात होती. या ट्रॉलींची टक्कर झाली. (Jharkhand 48 people still trapped after ropeway accident on Trikoot mountain of Deoghar)

दरम्यान एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केलं. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. मात्र या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचताच हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे ट्रॉली हलू लागल्या आहेत आणि त्यामध्ये असलेल्या लोकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.