Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशJEE Exam 2022 : जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलली, जाणून घ्या नवीन...

JEE Exam 2022 : जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलली, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

दिल्ली | Delhi

जेईई मुख्य परीक्षा २०२२ (JEE Main 2022) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. (JEE Main 2022 news update)

- Advertisement -

२१ एप्रिल रोजी होणारी जॉइंट एंट्रेस परीक्षा (Joint Entrance Examination JEE Main 2022) पुढे ढकलण्यात आली आहे. आयआयटीसह इतर केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते.

देशातील सर्वात लहान ‘तोफ’! औरंगाबादच्या विठ्ठल गोरेंची कमाल, पाहा PHOTO

विद्यार्थ्यांनी ही परीक्षा एप्रिल महिन्यानंतर घ्यावी अशी मागणी केली होती. तसेच या परीक्षेसाठी २ ऐवजी ४ वेळा संधी देण्यात यावी अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. नॅशन टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency NTA) विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली असून जेईई मेन परीक्षा २०२२ ची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. (JEE Exam 2022 new time table)

एनटीने या आधी २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८ आणि २९ जून २०२२ या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या तारखा पुढे ढकलून आता ही परीक्षा २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९ आणि ३० जुलै २०२२ रोजी होणार आहे. जेईई परीक्षेची माहिती आणि तारीख जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर लॉग ऑन करण्याचे आवाहन केले आहे.

VISUAL STORY : सोनम कपूरने फोटो शेअर करत दिली ‘गूड न्यूज’

- Advertisment -

ताज्या बातम्या