ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद; वडील शिंदेंकडे तर मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद; वडील शिंदेंकडे तर  मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यंदा एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बीकेसीतील (BKC) दसरा मेळाव्यात दिसून आल्याने एकच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता जयदेव ठाकरेंचे पुत्र जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले...

ते म्हणाले की, कुणी कुठली बाजू घ्यायची, तो त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाचे आपापले मत असते. ते तिथे का गेले, हे त्यांनाच विचारायला हवे. मी या घराचा सर्वात मोठा नातू आहे. मला माझ्या आजोबांबद्दल, उद्धव काकांबद्दल, आदित्यबद्दल प्रचंड आदर आहे. आपल्यासमोरचे हे चित्र फार विचित्र आहे. अशावेळी माझ्या कुटुंबासोबत असणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुढे-मागे जर मला संधी मिळाली किंवा त्यांना वाटले की माझ्यावर एखादी जबाबदारी सोपवावी, तर ती मी १०० टक्के स्वीकारेन आणि पक्षाला वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेन. रश्मी काकी आणि आदित्य यांच्याशी मी बोलत असतो. दसरा मेळाव्याच्या दिवशीही आम्ही बोललो. उद्धव काकांनाही भेटलो. त्यांना मला व्यवस्थित भेटायचे आहेच. त्यांची वेळ घेऊन लवकरच त्यांना भेटेन, असेही त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेनेत (Shivsena) जे झाले आहे ते कुणालाच पटलेले नाही. अशा वेळेला सर्वच कुटुंबियांनी एकत्र आले पाहिजे. पण जे तसे करत नाही, त्याचे कारण इतरांना विचारा, मला जे बरोबर वाटले ते मी केले. मला वाटले मी दसरा मेळाव्यात (Dasara Melava) जाऊन माझ्या काकांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. ते मी केले असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com