Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : ...अन् जयंत पाटलांनी मारली सुनील तटकरेंना मिठी; काय झाली...

NCP Crisis : …अन् जयंत पाटलांनी मारली सुनील तटकरेंना मिठी; काय झाली चर्चा?

मुंबई | Mumbai

अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत (NCP) मोठी फुट पडली असून या फुटीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटाच्या वेगवेगळ्या प्रदेशाध्यक्षांसह तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी निवडण्यात आले आहेत.

- Advertisement -

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा मुद्दा अधिवेशनात गाजला; देवेंद्र फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका

अशातच आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) विधानभवनात आमनेसामने आले असता एकमेकांना मिठी मारतांना पाहायला मिळाले. त्यानंतर दोघांमध्ये तब्बल १० मिनिटे चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच या चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेले नाही. मात्र तटकरे खासदार असून विधानभवनात (Vidhan Bhavan) हजर असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Nashik Road Crime News : विहितगावमध्ये चार दुचाकी जाळल्या; एकूण १५ गाड्यांचे नुकसान, घटनेनंतर परिसरात तणाव

तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की, पक्षातील अनेक आमदार (MLA) म्हणतात की, आम्ही सरकारमध्ये सामील होतो. जेणेकरून निधी मिळेल आणि विकास कामे होतील. दुसरीकडे अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे आमदारांमध्ये आनंद आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी खरच बंड आहे की, बंड (Rebellion) दाखवण्याचा प्रय़त्न होतोय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी डॉ. दीप्ती देशपांडे यांची नियुक्ती

दरम्यान, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी आपल्याला राष्ट्रवादीतील ३० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. यानंतर अजित पवार गटाच्या झालेल्या मेळाव्यात अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील बरेचसे आमदार असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी (State President) गप्पागोष्टी करत एकमेकांना मिठी मारल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Bar Set on Fire : बारमधून बाहेर काढल्यामुळे मद्यपीने लावली आग; ११ जणांचा होरपळून मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या