ED चौकशीआधी जयंत पाटलांच ट्विट, कार्यकर्त्यांना केल्या 'या' सुचना

ED चौकशीआधी जयंत पाटलांच ट्विट, कार्यकर्त्यांना केल्या 'या' सुचना

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करण्यात आली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या दिवशीच जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठवण्यात आली होती. ऐन सत्तासंघर्षाच्या निकाला दिवशीच जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस आल्यानं या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

जयंत पाटील यांच्यामागे ईडीचा ससेमिरा मागे लावल्याने त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी याविरोधात भाजपा आणि ईडीविरोधात आंदोलन पुकारले आहे. कार्यकर्त्यांनी ईडीच्या बॅनरबाजी केली आहे. तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबई दाखल झाले आहेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. दरम्यान, ईडी चौकशीला हजर राहण्याआधीच जयंत पाटलांनी ट्वीट (Jayant Patil Twitt) केलं आहे.

ED चौकशीआधी जयंत पाटलांच ट्विट, कार्यकर्त्यांना केल्या 'या' सुचना
धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

“आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे, असं जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले.

“माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

ED चौकशीआधी जयंत पाटलांच ट्विट, कार्यकर्त्यांना केल्या 'या' सुचना
Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? 'या' आमदारांची नावे चर्चेत..

दरम्यान, जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती, तेव्हा ते म्हणाले होते की, ज्या कंपनीच्या नावाने मला ही नोटीस आली आहे, त्या कंपनीशी माझा संबंध नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी ईडीने मला नोटीस पाठवली. सध्याकाळी पाच वाजता सही झाली आणि सहा वाजता ती नोटीस माझ्या घरी आली. त्या नोटीसीमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्याचा फाईल नंबर काढून बघितला तर असं दिसतंय की आयएफएससी नावाची कुठली तरी संस्था आहे आणि त्या संबंधात काही केस आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com