
मुंबई | Mumbai
काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Resignation) देणार असल्याची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक नेत्यांनी राजीनाम्याचे शस्त्र उपासले आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याचे समजते आहे. त्यामुळे दिवसभरात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.