Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : जयंत नाईकनवरे यांनी स्वीकारला नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार

Video : जयंत नाईकनवरे यांनी स्वीकारला नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता व नागरिकांच्या हिताचे काम करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणार असल्याचे नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naikanvare) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले….

- Advertisement -

यावेळी नवनियुक्त आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले की, तत्कालीन आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) व त्यांच्या आधीच्या आयुक्तांनी नाशिक शहरात (Nashik City) ज्या ज्या योजना राबवल्या व अध्यादेश काढले त्यांचा अभ्यास करून नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेणार आहे.

यासोबतच शहरातील पोलीस (Police) अधिकारी व नागरिकांसोबत चर्चा करून शहरासाठी चांगले निर्णय घेतले जातील. यावेळी तत्कालीन आयुक्त पांडेय यांनी शहरातील भोंग्यांसंदर्भात (Loud Speaker) नुकताच काढलेल्या अध्यादेशाबाबत अभ्यास करून व पांडेय यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

यावेळी उपायुक्त विजय खरात, उपायुक्त पौर्णिमा चौघुले उपस्थित होते. यावेळी नाशिक ग्रामीण अधीक्षक सचिन पाटील यांनी यांनी नाईकनवरे यांचे स्वागत केले.

एरवी वरिष्ठ अधिकारी आपला पदभार सोडत असतांना नवनियुक्त अधिकाऱ्याचा सत्कार करत आपला पदभार त्यांच्याकडे सुपूर्द करतात. मात्र तत्कालीन पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार स्विकारण्यापूर्वी दुपारीच मुंबईच्या दिशेने कूच केली. नवनियुक्त आयुक्त नाईकनवरे यांनी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

- Advertisment -

ताज्या बातम्या