Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजायकवाडी @८९ टक्के; नाशिकमधून 'इतक्या' पाण्याचा ओघ सुरु

जायकवाडी @८९ टक्के; नाशिकमधून ‘इतक्या’ पाण्याचा ओघ सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर धरण (Gangapur Dam) भरल्यानंतर मराठवाड्याला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) भरण्याचे वेध लागतात. यावेळी लवकरच जायकवाडी धरणाच्या जलाशयाची पातळी ८९ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे…

- Advertisement -

नाशिकसह परिसरात आज सकाळपासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाने उघडीप दिल्यामुळे धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दारणा धरणातून (Darna Dam) ७ हजार २४४ क्युसेस पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सद्यस्थितीत केला जात आहे. तर मुकणे धरणातून (Mukne Dam) होणारा विसर्ग कमी करून ३५९ वर आणण्यात आला आहे.

दुसरीकडे कडवा धरणातूनदेखील (Kadwa Dam) विसर्ग कमी करून १ हजार ३९६ वर आणण्यात आला आहे. वालदेवी धरणातूनदेखील ३४१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ब्रेक घेतल्यामुळे येथील विसर्ग कमी करून ९९६ क्युसेसवर आणण्यात आला आहे.

आळंदी धरणात ६८७ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर भोजापूरमधून सध्यस्थितीत ४५० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पालखेड धरणातून ३ हजर ७६० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असून याठिकाणी पावसाची संततधार सुरु राहिल्यास हा विसर्ग वाढविण्यात येईल असेही बोलले जात आहे.

पावसाने (Rain) शहरासह परिसरात उघडीप दिल्यामुळे आज सकाळपासून अनेकदा नाशिककरांना सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यामुळे नाशिककरांनी आज पावसापासून सुटकेचा निश्वास सोडला. सद्यस्थितीत होळकर पुलाखाली २ हजार ४३९ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळ गेल्या अनेक दिवसांपासून पूरसदृश्य स्थितीत असलेली गोदावरी काहीशी आज रिकामी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या