पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली; महिलेसह चिमुकलीचा मृत्यू, दुसऱ्या मुलीचा शोध सुरु

पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली; महिलेसह चिमुकलीचा मृत्यू, दुसऱ्या मुलीचा शोध सुरु

बोलठाण | वार्ताहर Bolthan

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) घाटमाथ्यावर आज दुपारी झालेल्या मुसळधार पाऊस झाला. जातेगाव (Jategaon) शिवारमध्ये आडगाव (Adgaon) ता. कन्नड जि. औरंगाबाद (Aurangabad) येथील शेतमजूर काम आटपून बैलागडीतून घराकडे निघाले असता रस्तात असलेल्या लेंडी नदीला (Lendi River) आलेल्या पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी (Bullock Cart) पलटी झाली. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला तर मुलगी पाण्यात वाहून गेल्याची घटना घटली....

मयतांमध्ये शेतमजूर मिनाबाई दिलीप बहिरव (वय 45, रा. आडगाव) साक्षी अनिल सोनवणे (वय 11, रा. आडगाव) यांचा समावेश आहे. तर पूजा दिनकर सोनवणे (वय 15)ही पाण्यात वाहून गेली आहे. तिचा शोध घेतला जात होता.

शुक्रवारी डोंगर परिसर व आडगाव (Adgaon) भागाकडे मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला. त्यामुळे अवधीतच नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. मागील वर्षी ही याच परिसरात बैलगाडी (Bullock Cart) उलटून बैल दगावले होते.

बोलठाण परिसरातील (Bolthan area) नागरिकांनी या घटनेत बचाव कार्य केले. यावेळी पोलीस नाईक अनिल गांगुर्डे उपस्थितीत होते. त्यांनी याबाबतची माहिती दिली. सापडलेले मृत देह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालय आहे. तर बेपत्ता असलेल्या पूजा दिनकर सोनवणे हिचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून (Aurangabad District Administration) शोधकार्य सुरु करण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com