आंतकवाद्यांचे मुंबई कनेक्शन : जान मोहम्मद ड्रायव्हर, कुरिअर बॉय म्हणून काम करायचा

आंतकवाद्यांचे मुंबई कनेक्शन : जान मोहम्मद ड्रायव्हर, कुरिअर बॉय म्हणून काम करायचा

मुंबई

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police) सहा दहशतवाद्यांना अटक (terrorist arrest) केली आहे. या सहा दहशतवाद्यांपैकी एक हा मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली. दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. या दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यावर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची (mumbao local) रेकी केली होती.

आंतकवाद्यांचे मुंबई कनेक्शन : जान मोहम्मद ड्रायव्हर, कुरिअर बॉय म्हणून काम करायचा
दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती, गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक

मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. त्यामध्ये समीर कालिया 12 सप्टेंबरपासून गायब होता आणि 14 तारखेला त्याला अटक झाली तेव्हाच ही बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार समीर कालिया मुंबईहून दिल्लीला जात असताना कोटा या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली.

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. “जान मोहम्मदने काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने आपल्याला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

पत्नीला याबाबत संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com