
दिल्ली | Delhi
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सीआयएसएफ (CISF) जवानांनी भरलेल्या बसवर मोठा दहशतवादी हल्ला (terrorist attack) झाला आहे. ही घटना जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या बसमध्ये १५ जवान होते.
सीआयएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यानंतर घटनास्थळी चकमक झाली, त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळवून गेले. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला असून दोघे जवान जखमी झाले आहेत.