अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत आशिया खंडात जळगावची भाग्यश्री पाटील प्रथम

अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत आशिया खंडात जळगावची भाग्यश्री पाटील प्रथम

जळगाव jalgaon

फिलिपींन्स फिडेमान्यता (Philippines' fidemanita) असलेल्या आशियाई चेस फे डरेशन (Asian Chess Federation) व फिलिपींन्स चेस फेडरेशन (Philippine Chess Federation) यांच्या संयुक्त विद्यामाने गाटे, फिलिपींन्स (GATE, PHILIPPINES) येथे सुरु असलेल्या अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ (Blitz chess tournament)स्पर्धेत जळगावची इंडियन ऑइलची खेळाडू (Indian Oil player) भाग्यश्री पाटील (Bhagyashree Patil) हि आशिया खंडात (First in Asia) प्रथम आली. स्विस लीग पद्धतीने घेण्यात आलेल्या ९ फेरी अखेर ७ विजय २ पराभूत असे तिने ७ गुण मिळविले.

भाग्यश्रीने खालील खेळाडूंना पराभूत केले:-

१) वुमन इं टरन्शनल मास्टर नुरगली नाझरेकी (कझाकस्थान). २) वुमन फिडेमास्टर असघरजादेह मित्रा (इराण), ३) साडेरिनोआ मॅरिएल (फिलिपींन्स), ४) वुमन फिडेमास्टर जाहिदीफार अनाहिता (इराण), ५) सुश्मिता भोमिक (भारत), ६) फेमिल चेलादुराई (भारत), ७)वुमन इं टरन्शनल मास्टर रक्षिता रवी (भारत) यांना पराभूत केले.तर भाग्यश्रीला खालील २ खेळाडूंसोबत पराभव स्वीकारावा लागला:-१) वुमन इं टरनॅशनल मास्टर कै रबेकोवा अमीना (कझाकस्तान), २) वुमन इं टरनॅशनल मास्टर सेरीकबेअस्सेल (कजकस्तान).

आशियाई जुनिअर अतिजलद (ब्लिट्झ) स्पर्धेत पहिले५ खेळाडू पुढील प्रमाणे:-

१) वुमन फिडेमास्टर भाग्यश्री पाटील ७ गुण (भारत), २) वुमन इं टरन्शनल मास्टर नुरगली नाझरेकी ६.५ गुण (कझाकस्थान), ३) वुमन इं टरन्शनल मास्टर रक्षिता रवी ६ गुण (भारत), ४) वुमन इं टरनॅशनल मास्टर कै रबेकोवा अमीना ६ गुण (कझाकस्तान), ५) वुमन फिडेमास्टर असघरजादेह मित्रा ६ गुण (इराण). पहिल्या तीन खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आलेव चौथा आणि पाचव्याला पारितोषिक देण्यात आले.

भाग्यश्रीला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत आशिया खंडात ५वा क्रमांक तर क्लस्सिक बुद्धिबळ स्पर्धेत आशिया खंडात ९व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. इंडियन ऑइलची भाग्यश्री विविध वयोगटात चार वेळा भारतात पहिली, एक वेळेस दुसरी व तीन व तीन वेळेस तिसरी अशी भारतीय संघात आठ वेळा निवड होणारी भारताच्या बुद्धिबळ खेळातली इतिहासातील पहिली खेळाडू ठरत आहे.

भाग्यश्री पाटील हिने जागतिक ८ वयोगटात जगात तिसरा क्रमांक मिळवून भारताला कास्यपदक मिळवून दिले आहे. आता पर्यंत तिला आंतरराष्ट्रीय २१ व राष्ट्रीय १८ असे एकूण ३९ पदके मिळविले आहे. त्यात आशियाई, कॉमनवेलथ व जागतिक लेव्हल यांचा समावेश आहे.

भाग्यश्री २०२२ ते २०२३ या साली विविध १४ देशात जाऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

भाग्यश्रीच्या या यशाबद्दल आखिल भारतीय बुद्धिबळ सन्घटनेचे सल्लागार समितीचे संचालक तथा जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी दूरध्वनी वरून भाग्यश्रीचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके, कार्यदक्ष सिद्धार्त मयूर, सचिव निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष अभिजित कुंटे,नरेंद्र फिरोदिया, फारूक शेख यांनी शुभेच्छा पाठविल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com