जळगावच्या मनपात खुर्ची एक आयुक्त दोन

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव महापालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) अधिकार्‍यांच्या बदल्या (Transfer of Officers) झाल्यामुळे उर्वरीत अधिकारी कर्मचार्‍यांवर (Officers on staff) कामाचा अतिरीक्त ताण पडत आहे. त्यात मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) याची तडकाफडकी बदली झाली. नूतन आयुक्त देविदास पवार (New Commissioner Devidas Pawar)यांनी पदभार घेतला आणि दुसर्‍याच दिवशी मॅटने आयुक्त (Matt replaced the commissioner) बदलीच्या आदेशाला स्थगिती (Suspension of order) दिली. त्यामुळे आयुक्त खुर्चीसाठीचा खेळ (game for the commissioner's chair)जळगावकरांना पहावयास मिळत आहे.

मनपात अधिकारी कर्मचार्‍यांची दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. याचा परिणाम कामकाजेवर होत आहे. गेल्या दीड वर्षात मंजुर पदांपैकी अतिरीक्त आयुक्त, 2 उपायुक्त, 3 सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, मुख लेखा परिक्षक, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, नगरसचिव आदींसह 1113 कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहे. उदय मधुकर पाटील व सुनील गोराणे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्तपद दिले आहे. मनपाचे मुख्य लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे अर्थ विभागासह आस्थापना विभागाचा अतिरीक्त कारभार आहे. सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्याकडे महसूल, अतिक्रमण, विधी व लेखा विभाग दिला आहे.

दीड वर्षात झालेल्या बदल्या

मनपात दीड वर्षात प्रमुख सहा अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या यात अतिरीक्त आयुक्त शाम गोसावी, उपायुक्त प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार, मुख्य लेखा परिक्षक संतोष वाहुळे यांच्या बदल्या झाल्या आहे.

खुर्ची एक आयुक्त दोन जळगाव महापालिकेत काहीही होवू शकते असे अनेक उदाहरणे आहे. यात महापौर आणि विरोधी पक्षनेता एकाच घरात तेही बहुमत नसतांना. एकाच पक्षाचे दोन गटनेते आणि आता खुर्ची एक आणि दोन आयुक्त असा अद्भुत कारभार पाहण्यास मिळत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com