Tuesday, April 23, 2024
Homeजळगावजळगावच्या महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे लेखा परिक्षण व्हावे

जळगावच्या महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे लेखा परिक्षण व्हावे

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहर महानगर पालिका (Jalgaon City Municipal Corporation) आयुक्ताचा पदभार (Charge of the Commissioner) सहा महिन्यापूर्वी डॉ. विद्या गायकवाड (Dr. Vidya Gaikwad) यांनी स्विकारला. पण त्यांच्या पदास अऩुसरून व त्यांच्याकडे असलेल्या अधिकारानुसार आजपर्यंत शहरासाठी व नागरिकांसाठी (city and the citizens) कुठल्याही मुलभूत सुविधा, ठोस विकासकात्मक (Infrastructure, solid development decisions) निर्णय घेतेले नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचे लेखा परिक्षण (Audit of work) व्हावे अशी मागणी समाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते अऩिल नाटेकर (RTI activist Anil Natekar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

एकनाथराव खडसे म्हणतात : सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

जळगाव मनपा आयुक्तपदी तत्तालीन सेवानिवृत्त आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्या जागी डॉ. विद्या गायकवाड यांची कायद्याच्या चौकटीत बसत नसतांना ही त्यांची निवड केली. तसेच माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनूसार त्यांना मासिक 1 लाख 39 हजार 656 रुपये ऐेेवढा पगार मिळत आहे.

अन् त्यांच्या संशोधनाच्या अविष्कारावर पारितोषिकांची उमटली मोहर

परंतू राज्यशासनाकडून जर ऐवढा पगार त्यांना मिळत असेल तर मनपाचे काम सुरळीत चालविणे, नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांच्या मुलभूत सुविधा, गरजा, सेवा पुरविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतू सहा महिन्याच्या काळात त्यांच्याकडून ठोस व विकासात्मक कामेच झालेले दिसत नाही.

त्यांच्या दैनंदिन कामांचे लेखा परिक्षण करण्यात यावे. तसेच आयुक्त डॉ. गायकवाड यांच्या जागेवर प्रविण गेडाम, तुकाराम मुंडे यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्त करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी राज्यपाल यांना पत्राद्वारे केली आहे.

जळगाव येथील तरुणाचा पालनजीक अपघाती मृत्यू 

- Advertisment -

ताज्या बातम्या