जळगाव लव्ह जिहादचे आश्रयस्थान

हिंदू राष्ट्र जागृती सभेत ज्येष्ठ संपादक सुरेश चव्हाणके यांचा दावा
जळगाव लव्ह जिहादचे आश्रयस्थान

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सीमी प्रकरणातील (seemi case) संशयितांसाठी जळगाव हा गड राहिला आहे. परंतु आता लव्ह जिहादसाठी (Love Jihad) जळगाव जिल्हा हा आश्रय स्थान बनत चालला असून संपुर्ण राज्यातील लव्ह जिहादींना याठिकाणी आश्रय (place of refuge) देण्याचे काम सुरु असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांनी हिंदू जनजागृतीच्या राष्ट्र जागृती (Nation Awareness of Hindu Public Awareness) सभेत केला.

शहरातील छत्रपती शिवतीर्थ मैदानावर हिंदू जनजागृती समितीतर्फे हिंदू राष्ट्रजागृती सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या. सभेची सुरुवात शंखनाव व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती पुरुषोत्तम शुक्ल, भूषण मुळे, श्रीराम जोशी, प्रवीण जोशी, महेश जोशी यांनी वेदमंत्रपठण केल्यानंतर सभेला सुरुवात झाली. पुढे बोलतांना ज्येष्ठ संपादक चव्हाणके म्हणाले की, पुर्वी राजकीय पक्ष टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली जात नव्हती. परंतु आता राजकीय नेतेच त्यांच्या जयंतीमध्ये सामील होत आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षात रहाव. पण त्यांनी दिशाभूल होवू नये असेही ते यावेळी म्हणाले. सभेला हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीचे सतीश कोचरेकर यांनी मानले.

भगव्याचा अपमान करणार्‍या चित्रपटावर बहिष्कार घाला

भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्‍यांसह भगव्याचा अपमान कररणार्‍या शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावर बहिष्कार घाला असे आवाहन ज्येष्ठ संपादक श्री. चव्हाणके यांनी उपस्थितीतांना केले.

लॅण्ड जिहाद रहित करा- सुनिल घटनवट

वक्फ बोर्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा, नाशिक जिल्ह्यातील निफाड यांसह अनेक ठिकाणी वक्फ बोर्डने जमिनींवर दावा लावला आहे. यामाध्यमातून लॅण्ड जिहादच चालू आहे. ते थांबवण्यासाठी वक्फ अ‍ॅक्ट रहित करणे आणि वक्फ बोर्ड रहित करण्यासाठी विरोध करा असेही ते यावेळी म्हणाले. त्यानंतर नंदकुमार जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक -रागेश्री देशपांडे

सध्या लव्ह जिहादच्या माध्यमातून अनेक प्रकरणे समोर येत आहे. हिंदू मुलगी त्याला बळी पडल्यास तिचे बळजोरीने धर्मांतर करुन तीचा वापर शरिर उपभोगासाठी केला जातो. त्यामुळे हे संकट रोखण्यासाठी हिंदु मुलींनी धर्माचरण करणे आवश्यक असल्याचे मत रागेश्री देशपांडे यांनी व्यक्त केले.

खान्देश नाही तर कान्हादेश म्हणा

खान्देशची भूमी ही खानांची नाही तर कान्हांची भूमी आहे. त्यामुळे यापुढे या भूमीला कान्हादेश म्हणा. तसेच जळगवात मोठ्या प्रमाणात वाढलेली गोतस्करी, गोहत्या आणि गोरक्षकांवर हल्ले होत आहे. ते सुरक्षीत नाही तर सत्तेचा काय उपयोग असे म्हणत त्यांनी गोरक्षण करणार्‍यांच्या मागे आम्ही सक्षमपणे उभे असल्याचे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com