
जळगाव jalgaon
शितलहरीमुळे थंडीचा जोर पुनश्च वाढला असून जळगावचा (jalgaon) तापमानाचा पारा 5 अंशांवर घसरला आहे. थंडीमुळेजिल्हा कमालीचा गारठला आहे, कमाल तापमानही 28.अंशापर्यत आले आहे. राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे महाबळेश्वर (Mahabaleshwar) पेक्षाही जळगाव थंडे -थंडे (colder) कुल कुल ठरले आहे.
राज्यात थंडीची लाट पसरली असून जळगाव शहराचे तापमानात कमालीची घट गेल्या तीन-चार दिवसापासून झालेली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा लाट असल्याने गार वार्यांमूळे जळगाव जिल्ह्यातील गारठा प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सोमवारी जळगाव शहराचे तापमान 5 अंश सेल्सीअस होतेे. जळगावत 1 जानेवारी पासून थंडीत वाढ होवून थंडीची लाट वाढली आहे. येत्या दोन-तीन दिवसात थंडीचा गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज ममुराबाद वेध शाळेने वर्तवीला आहे.
येत्या 48 तासांत, नंदुरबार,धुळे जळगाव, नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता आहे, तर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भतील काही भागात थंडीची लाट शक्यता आहे.कडाक्याच्या थंडीमुळे गहू,हरभरा पिकांना फायदा होत आहे.आर्द्रतेचा प्रभाव कमी होऊन ढगाळसदृश वातावरण निवळून थंडी वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवार (दि.10)पासून किमान तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू घसरण होऊन रविवार दि.15 जानेवारी म्हणजेच संक्रांतीपर्यन्त मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी थंडीची शक्यता आहे.दरम्यानच्या काळात मुंबईसह कोकण विभागातही मात्र किमान तापमान सरासरीइतके राहून त्या प्रमाणातच थंडी जाणवेल.
या थंडीमुळे आतापर्यंत असलेल्या दमट वातावरणामुळे कांदा,गहू,हरबरा सारख्या रब्बी पिकावर काही ठिकाणी झालेल्या कीड व बुरशीच्या प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
मध्य प्रदेशपर्यंत संपूर्ण उत्तर भारतात उच्च टक्केवारीतील आर्द्रता व मंद वार्यामुळे दाट धुक्याचा प्रभाव कायम असून सकाळ प्रहरात काही ठिकाणी दृश्यता निम्न पातळी (समोर 50 मीटर अंतरावरील न दिसणे) पर्यंत जाणवत आहे.
माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ