RSS मुख्यालय रेकीमागे आत्मघाती हल्ल्याचा कट

RSS मुख्यालय रेकीमागे आत्मघाती हल्ल्याचा कट

नागपुरातील (Nagpur) संघ मुख्यालय (RSS Headquarters)आणि डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन याच्या रेकीमागे आत्मघाती हल्ल्याचा कट असल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे. ज्या व्यक्तीने नागपुरात रेकी केली होती तो व्यक्ती जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed)या दहशतवादी संघटनेचा हस्तक असून त्याचे नाव रहीस अहमद शेख (वय 26 वर्ष) असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती नागपूर पोलीस आयुक्तांना प्राप्त झाल्याची माहिती आहे. ही माहिती मिळताच नागपूर येथील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही यावृत्ताला दुजोरा दिला आहे.

RSS मुख्यालय रेकीमागे आत्मघाती हल्ल्याचा कट
कोरोना रुग्णसंख्या मोठी वाढ: पंतप्रधानांनी आज बोलवली तातडीची बैठक

शेखने गेल्या वर्षी जुलैमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन भारतात पाच वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी शोपियानचा रहिवासी असून दिल्लीचा विद्यार्थी आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुजाहिदीन गजवत-उल हिंद (MGH) च्या सूत्रधारांच्या सूचनेनुसार त्याने हे कृत्य केले.

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी श्रीनगर येथे केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती रईस लागला आणि त्यानेच नागपुरात रेकी केली असल्याची माहिती यंत्रणेला दिली होती. हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील असल्यामुळे नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा, एटीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे.

RSS मुख्यालय रेकीमागे आत्मघाती हल्ल्याचा कट
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

नेमकं प्रकरण काय?

नागपुरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी संघटना शहरात घातपाती कारवाया करण्याचा कट आखत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली होती.

यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे नाव पुढे आलं होतं. त्यांनी माहिती देताना सांगितलेलं की, 'मागील काही दिवसांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली की, जैश-ए-मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी नागपुरात काही ठिकाणी रेकी केली आहे. अशा प्रकारे रेकी केल्याप्रकरणी प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागपूर गुन्हे शाखा करत आहे.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com