जगदीप धनखड देशाचे १४ वे उपराष्ट्रपती

जगदीप धनखड देशाचे १४ वे उपराष्ट्रपती

नवी दिल्ली । New Delhi

पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी राज्यपाल (Former Governor) जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती (Vice President) म्हणून आज शपथ (oath) घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) हा शपथविधी सोहळा पार पडला. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ बुधुवारी (१० ऑगस्ट) संपला आहे...

७ ऑगस्टला पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (National Democratic Alliance) उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७८० पैकी ७२५ खासदारांनी (MP) मतदान (Voting) केले होते.

संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या ७८८ आहे. त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७८० खासदार मतदानासाठी पात्र ठरले होते. या निवडणुकीत धनखड यांना ५२८ मते मिळाली होती. तर अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते. धनखड यांना एकूण ७३ टक्के मते मिळाली होती.

दरम्यान, या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President RamNath Kovind) माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते.

जगदीप धनखड यांची राजकीय कारकिर्द

जगदीप धनखड यांची कारकिर्द पाहता, १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी १९९० मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्ही पी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. १९९१ मध्ये धनखड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९३ मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर २००३ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनखड यांची जुलै २०१९ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखड यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. धनखड हे क्रीडाप्रेमी म्हणूनही ओळखले जातात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com